शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (12:03 IST)

लसीकरणात मुंबईचा विक्रम100% प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारे देशातील पहिले मेट्रो शहर ठरले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी शनिवारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस येथील 100% प्रौढ लोकसंख्येला म्हणजेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले की, शहरातील एकूण प्रौढ लोकसंख्या 92 लाख 36 हजार 546 असून, दुपारी 4 वाजेपर्यंत येथे 92 लाख 50 हजार 555 लोकांना लसीकरण देण्यात आले आहे. यासह, मुंबई हे देशातील पहिले मेट्रो शहर बनले आहे, जिथे 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
 
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मुंबईत लसीचा दुसरा डोस लागू करणाऱ्यांची संख्या 59 हजार 83 हजार 452 झाली आहे. हे एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 65% आहे. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत 92 लाख 35 हजार 708 लोकांना म्हणजेच 99.99 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला होता. शनिवारी 838 डोस दिल्यानंतर मुंबईने 100 टक्क्यांचा टप्पा ओलांडला.
 
बीएमसी अधिकाऱ्याच्या मते, मुंबईत दररोज लसीचे 2लाख डोस वितरित करण्याची क्षमता आहे. परंतु अजूनही काही भागात लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. मुंबईच्या आसपासचे शहरी लोकही येथे लस घेण्यासाठी येत असल्याने काही मुंबईकर आजही लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. असे असूनही दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांपेक्षा मुंबईतील लसीकरण मोहीम अधिक वेगवान आहे. सध्या स्थानिक प्रशासन दुहेरी डोस लसीकरणाकडे लक्ष देत आहे.
 
या यशाबद्दल, BMC चे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “आमच्या लसीकरण कव्हरेजमध्ये लसीकरण केंद्रांच्या विकेंद्रीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 100% प्रथम डोस कव्हरेज ही एक चांगली बातमी आहे. आता शहरात कोविडशी लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. तिसरी लाट आली तरी मुंबई त्याच्याशी लढायला तयार असेल. लसीकरणाचा अर्थ असा नाही की, तिसर्‍या लाटेचा धोका संपेपर्यंत गाफील राहावे लागेल.तिसऱ्या लाटेचा धोका टळे पर्यंत  आपण सामाजिक अंतर आणि मास्कचे नियम पाळले पाहिजेत.
 
ते पुढे म्हणाले की, फ्रान्ससारख्या देशाला पाचव्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना त्याविरोधात अधिक भक्कमपणे उभे राहावे लागणार आहे.