रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (15:13 IST)

मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरे, सुप्रिया यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे तिघे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या तिघांविरुद्ध निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अर्धवट माहिती दिल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत निवडणूक आोगाने सीबीडीटीकडे तपास पाठवला असल्याचे मीडिया रिपोट्‌र्समध्ये सांगितले जात आहे.
 
आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे या तिघांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आोगाकडे केली असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत.