बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:36 IST)

शरद पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील : नवाब मलिक

Sharad Pawar will now show 'Kashicha Ghat' to Fadnavis: Nawab शरद पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील : नवाब मलिक Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत विधान करणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. यापूर्वीही पवारांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावे लागते. पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, अशी बोचरी टीका भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.