सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (12:23 IST)

'तिने आत्महत्या केली', आरोपी मनोज म्हणाला- मी एचआयव्ही पॉझिटिव्ह

Mira Road Murder लिव इन पार्टनरच्या हत्याकांडातील आरोपीने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मनोज साने याने महिलेची हत्या केली नसल्याचे सांगितले. मनोज साने आणि महिला गेल्या पाच वर्षांपासून लिन-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
 
मृतदेहाचे तुकडे, कुकरमध्ये उकडलेले
56 वर्षीय मनोज साने त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य (32) हिच्यासोबत मीरा रोडच्या नया नगर भागात असलेल्या गीता आकाशदीप बिल्डिंगमध्ये राहत होता. मनोजने आधी सरस्वतीची निर्घृण हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, ते तुकडे कुकरमध्ये उकळले, नंतर मिक्सीमध्ये ग्राइंड केले.
 
मनोजच्या शेजाऱ्यांना त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने हा निर्घृण खून उघडकीस आला. विचित्र वास आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मनोज साने यांच्या फ्लॅटमध्ये पोलीस घुसले तेव्हा ते चक्रावून गेले. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे अनेक भांड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ मनोजला अटक केली.
 
सरस्वतीने आत्महत्या केली
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मनोजने मोठा खुलासा केला आहे. मनोजने सांगितले की, त्याने सरस्वतीची हत्या केली नाही, तर सरस्वतीने 3 जून रोजी आत्महत्या केली होती. सरस्वतीच्या मृत्यूनंतर आपल्यावर तिच्या हत्येचा आरोप होईल अशी भीती त्याला वाटत होती, म्हणून त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. 
 
दुर्गंधी टाळण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळल्याचे मनोजने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर आपणही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
 
'मी HIV+ आहे'
मनोजने चौकशीत आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजने पोलिसांना सांगितले की तो एचआयव्ही+ आहे. त्याच्या HIV+ असल्याच्या दाव्याची पोलीस चौकशी करत आहेत. महिलेलाही विषाणूची लागण झाली होती का, याचाही तपास पोलीस करणार आहेत.
 
मनोज साने यांच्या दाव्याची चौकशी
सरस्वती हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सरस्वतीने आत्महत्या केली की हत्या केली हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल. तसेच, मनोजच्या HIV+ पॉझिटिव्ह असल्याच्या दाव्याची चौकशी केली जाईल.