शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (14:39 IST)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकाबाहेर महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

rape
देशात सध्या महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका 29 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

सदर घटना 22 सप्टेंबर रात्रीची आहे. महिला स्थानकाच्या बाहेर एकटी उभी असताना दोन जणांनी एका महिलेलातिचे तोंड दाबून बळजबरी एका टेक्सीस्टँड जवळ नेले आणि तिला धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली आहे. 
 
या प्रकरणी प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आता हे प्रकरण माता रमाबाई मार्ग मुंबई पोलिसांच्या ठाण्यात वळवले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit