'फ्लॅग मीटिंग' म्हणजे काय?
'
फ्लॅग मीटिंग' म्हणजे दोन शेजारी देशांमधील वरिष्ठ सैन्याधिकार्यांमध्ये होणारी उच्चस्तरीय बैठक होय. भारत आणि पाकिस्तान तसेच भारत आणि चीन या शेजारी देशांमधील सैन्याधिकार्यांमध्ये अशा प्रकारच्या 'फ्लॅग मीटिंग' अर्थात उच्चस्तरीय बैठका होत असतात. भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच 'एलओसी'वर सातत्याने दोन्ही बाजूंकडून गोळीबार किंवा लहानसहान लष्करी कारवाया होत असतात. अशा कारवायांमधून जेव्हा दोन्ही देशांमधील स्थानिक पातळीवरील म्हणजे संबंधित सीमेवरील लष्करी नेतृत्वात काहीतरी गैरसमज होतात, त्यावेळी अशा फ्लॅग मीटिंगचा उद्देश्य दोन्ही देशांमधल्या सैन्यात निर्माण झालेले तत्कालीन गैरसमज दूर करणे, तसेच अतिशय तातडीच्या वेळी सज्जड इशारे किंवा दम देण्यासाठी होतो.