केंद्रीय कर्मचार्यांना मिळणार दोन वर्षांचा बोनस
नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचार्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट मिळालेले आहे. गेल्या दोन वर्षाचा बोनस देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 33 लाख कर्मचार्यांना होणार आहे. 2014-15 आणि 2015-16 असा दोन वर्षापासून थकित असलेला बोनस कर्मचार्यांना मिळणार आहे. हा बोनस सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू होईल.
बिगरशेती कर्मचार्यांचे किमान दैनिक वेतन 350 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही यावेळी जेटलींनी केली. दररोज किमान 246 रुपये असलेल्या या वेतनात 104 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.