सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जयललितांकडून 2 तासात 500 दारूची दुकाने बंद

चेन्नई- अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता विक्रमी सहाव्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या दोन तासातच त्यांनी राज्यातील 500 दारूची दुकाने बंद केली. जयललिता यांनी निवडणुकीपूर्वी नागरिकांना काही आश्वासने दिली होती. आश्वासने पूर्ण करणार असल्याचे जयललिता यांनी सांगितले. राज्यातील दारूची दुकाने दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंतच उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, 500 दुकाने बंद केली आहेत. शिवाय, शेतकर्‍यांसाठी कर्जयोजनाही सुलभ केली आहे.