1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 4 जुलै 2015 (15:12 IST)

जेठमलानींना दाऊद म्हणाला ‘मला भारतात यायचयं’

राम जेठमलानी यांना दाऊद इब्राहिमने संपर्क साधला होता. भारतात परत येण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. राम जेठमलानी यांनीच एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

जेठमलानी म्हणाले, दाऊदशी बोलणे झाले तेव्हा त्याने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाँबस्फोटामागे माझा कोणताही सबंध नसल्याचे तो सांगत होता. याबाबत मी शरद पवारांना पत्रही दिले होते. भारतात आल्यावर त्याला पोलिसी खाक्यापेक्षा खून होण्याची भीती होती. पोलीसांकडून ‘थर्ड डिग्री’चा वापर होता कामा नये, या अटीवर तो भारतात परतायला तयार होता, असे जेठमलानी यांनी म्हटले आहे.