रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दोन पाक एजंटना गुजरातमध्ये अटक

अहमदाबाद- गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यामधील खडवा या भारत-पाकिस्तान सीमारेषेनजीकच्या गावामध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या दोन एजंट्सना अटक करण्यात आली. 
 
गुजरात राज्यामधील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. मोहम्मद अलाना आणि सुफूर सुमारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या भागामधील भारतीय लष्कर व निमलष्लरी दलांच्या हालचालींसंदर्भातील माहिती स्पष्ट करणारी कागदपत्रे या दोघांकडून हस्तगत करण्यात आली आहेत.