सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2016 (12:40 IST)

नाही कापले जाणार जाऊदचे पाय, छोटा शकील म्हणाला भाई एकदमफिट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गँगरीन झाल्याच्या बातमीला त्याचा मुख्य सहायक छोटा शकीलने फेटाळले आहे. छोटा शकीलने म्हटले की भाई एकदम फिट आहे.  
 
दाऊदच्या आजारपणाचे वृत्त खोटे असून छोटा शकीलने टाइम्स ऑफ इंडियाला म्हटले आहे की, 'तुमच्या एजेंसीजवळ चुकीचे वृत्त आहे. ही फक्त अफवा आहे. भाई (दाऊद) बिल्कुल स्वस्थ आणि सेहतमंद आहे.'
 
महत्त्वाचे म्हणजे काल मीडियाहून आलेल्या वृत्तानुसार पळपुटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला आपले पाय गमवावे लागणार आहे. पायाला गँगरीन झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, गँगरीन पासून वाचण्यासाठी पाय कापणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर असल्याचे वृत्त आहे.
 
दाऊदवर सध्या कराचीच्या लिकायत नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून सूत्रांप्रमाणे दाऊदच्या पायाचे गँगरीन अगदी शेवटच्या टोकाला पोहोचले आहे. त्यामूळे दाऊदचा जीव वाचवायचा असेल तर, पाय कापणे हे इतकेच आमच्या हाती असल्याचे दाऊदच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. 
 
उपचारासाठी त्याला पाकिस्तानबाहेर न पाठविण्याचे पाक ठरविले असल्याने दाऊदला पाकमध्ये उपलब्ध वैद्यकीय सुविधांवर अवलंबून राहावे लागणार अस्लयाचेही सांगण्यात येत आहे. दाऊद हा 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून तो जगातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याकांच्या यादीत आहे.