सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (17:58 IST)

बिहारचा गुंड शहाबुद्दीन पुन्हा तुरुंगात सर्वोच्च न्यायालयाने केला जामीन रद्द

पूर्ण भारतात गाजलेला आणि अनेक गुन्हे नावावर असलेला तर हत्या प्रकरणी तुरुंगातून जामीन मिळवून बाहेर आलेला बिहारचा गुंड  शहाबुद्दिन अखेर सर्वोच्च न्यायालयाने जमीन रद्द केला असून सर्वोच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याला शरण येण्याचे आवाहन केले आहे. तर यावेळी न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयास राजीव रोशन हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यास सांगितले आहे. राजीव रोशन खूनप्रकरणी शहाबुद्दीन यांना पाटणा उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. हा जामीन रद्द करावा यासाठी राजीव रोशन यांचे वडील चंद्रकेश्वर प्रसाद (चंदा बाबू) यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
 
या गुंड शहाबुद्दीन वर   ४० पेक्षा अधिक गंभीर आणि खुनाचे, खंडणीचे  गुन्हे दाखल आहेत.  खून प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने शहाबुद्दीनला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षविरोधात शहाबुद्दीनने उच्च न्यायालयात अपील केले .
सिवान येथील चंदाबाबू यांचे तीन मुले राजीव, गिरीश आणि सतीश यांचा खून करण्यात आला आहे. त्यांचा मोठा मुलगा राजीव याने आपल्या दोन्ही भावांच्या खून प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून जवाब दिला होता. त्यानंतर राजीव यांचाही खून करण्यात आला होता. राजीव खून प्रकरणात शहाबुद्दीनही आरोपी आहे. न्यायालयाने नितीशकुमार सरकारवर ताशेरे ओढले होते. राजीव रोशनच्या हत्येला १७ महिने होऊनही शहाबुद्दीनवर आरोपपत्र दाखल का करण्यात आला नाही, असा जाब न्यायालयाने सरकारला विचारला. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा राज्य सरकारला फटकारले असून तुम्ही काय  झोपला होता काय अशी विचारणा केली असून अनेक सूचना सुद्धा दिल्या आहेत.या गुंडाला अटक झाल्यामुळे पुन्हा हत्या प्रकरणावर सुनवाई सुरु होणार आहे. चंदबाबू यांना पुन्हा न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे.