सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नव्या चेहर्‍यांना संधी

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दहा राज्यातून 19 नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार असून यात पाच एसटी, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांना स्थान मिळणार आहे.
 
रामदास आठवले यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे दलितांची सहानुभूती मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
 
दुसरीकडे धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.