सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (10:27 IST)

मोदी ओबामांशी शेअर करणार ‘मनातली गोष्ट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सहभागी होणार आहेत. २७ जानेवारीला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. 

जनतेला प्रश्न पाठविण्याचे आवाहन करतानाच लोकांच्या सहभागाशिवाय ओबामांसह मन की बात पूर्ण होऊ शकणार नाही, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही अप्रत्यक्षपणे ओबामांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.