शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदी सरकारकडून 45 हजार कोटींचा टेलिकॉम घोटाळा !

नवी दिल्ली- केंद्र सरकारने ४५ हजार कोटी रुपयांचा टेलिकॉम घोटाळा केला असून आता तो लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. 
 
व्यापमपासून पनामा, कोळसा खाण वाटप आणि रेशन घोटाळा पाहता केंद्र सरकार घोटाळ्यात बुडाले असल्याचेच स्पष्ट होते, असे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात, मी खात नाही आणि कुणाला खाऊही देत नाही. मोदींच्या अनेक खोट्या आश्वासनांसारखे हेही एक आश्वासन आहे. 
 
ललित मोदीगेट घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, छत्तीसगडमधील रेशन घोटाळा, गुजरातमधील जीएसपीसी घोटाळा, विजय मल्ल्या कर्ज घोटाळा, छत्तीसगडचा प्रियदर्शनी बँक घोटाळा, पनामा पेपर्स, 'फेअर अँड लव्हली' काळा पैसा जाहीर करण्याची योजना, असे अनेक घोटाळे या सरकारच्या सत्ताकाळात केंद्रात आणि भाजपशासित राज्यांत झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. उद्योगपती मित्रांना मदतया सरकारने ४५ हजार कोटी रुपयांचा टेलिकॉम घोटाळा केला असून आता तो लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.