सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सव्वाशे किलो वजनी पत्नीखाली दबून पतीचा मृत्यू

गुजरात येथे एका विचित्र घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. राजकोट येथे राहणारे नटवरलाल तेव्हा गंभीर जखमी झाले जेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यावर पडली. रामधाम सोसायटी येथे राहणार्‍या महिलेचा पाय घसरला आणि ती आपल्या पतीवर जाऊन पडली, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला.
 
प्राप्त माहितीप्रमाणे महिलेचे वजन 128 किलो होतं आणि घसरून पतीवर पडल्यामुळे नटवरलाल गंभीर जखमी झाले, नंतर ते मृत्युमुखी पडले.
 
सूत्रांप्रमाणे, 68 वर्षाच्या मंजुळा विट्ठल यांच्या आशीष नावाच्या मुलाला पहाटे चार वाजता श्वास घेयला त्रास होत असल्यामुळे त्या घाबरून घाईघाईत मुलाच्या खोलीत जाण्यासाठी पायर्‍या चढत होत्या. त्यांच्या माघोमाघ पती नटवरलाल होते. यादरम्यान मंजुलाचा पाय घसरला आणि त्या पतीवर आदळल्या.
 
वजन अधिक असल्यामुळे नटवरलाल यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.