विषारी वनस्पती खाल्ल्याने 10 हत्तींचा मृत्यू
मध्य प्रदेशातील बांधवगड अभयारण्यात गेल्या काही दिवसांत 10 हत्तींचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी याबाबत महत्त्वाची माहिती देताना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारींनी सांगितले की, नुकत्याच मृत्यू झालेल्या 10हत्तींच्या व्हिसेरामध्ये 'न्यूरोटॉक्सिन सायक्लोपियाझोनिक ॲसिड' आढळून आले आहे. हत्तींना विषबाधा झाल्याची ही घटना नसून एका झाडामुळे घडली आहे. हत्तींच्या मृत्यूची ही मालिका 29ऑक्टोबरपासून सुरू झाली जेव्हा बांधवगड व्याघ्र प्रकल्पात एकाच वेळी 4 हत्ती मृतावस्थेत आढळले होते.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारने स्थापन केलेल्या तपास पथकाचे नेतृत्व करत अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एल. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, हत्तींच्या व्हिसेराच्या अहवालात कोडो वनस्पती मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने हत्तींच्या शरीरात विष पसरल्याचे समोर आले आहे. तसेच उमरिया जिल्ह्यातील बांधवगड अभयारण्यात 29ऑक्टोबर रोजी चार हत्ती मृतावस्थेत आढळून आले आणि त्यानंतर मृतांची संख्या 10 झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्ती मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. कृष्णमूर्ती म्हणाले की, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (IVRI) बरेलीकडून मंगळवारी हत्तींचा व्हिसेरा अहवाल प्राप्त झाला. कृष्णमूर्ती म्हणाले की, हत्तींमध्ये सायक्लोपियाझोनिक ॲसिड आढळले असले तरी विषाची वास्तविक पातळी निश्चित केली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik