शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (15:17 IST)

PM किसान किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता जारी

pm-kisan-samman-nidhi
आज, 31 मे 2022 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यात आहेत, तेथून त्यांनी देशातील गरजू शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. वास्तविक, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता जारी केला आहे.  केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिमला येथे राष्ट्रीय स्तरावर 'गरीब कल्याण संमेलन' आयोजित करण्यात आले होते. तेथून पंतप्रधान मोदींनी अनेक योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि पीएम किसान योजनेचा 11वा हप्ताही जारी केला. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आज त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आता हा 11 वा हप्ता असेल. 
 
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आज जाहीर होणार्‍या 11व्या हप्त्यात 2 हजार रुपये मिळतील. सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये पाठवणार आहेत.आपल्या खात्यात पैसे आले की नाही असे तपासा.
 
* तुम्ही मेसेजद्वारे असे तपासू शकता
या योजनेचा 11वा हप्ता सरकार जेव्हा जारी करेल, तेव्हा तुमच्या खात्यात पैसे आले तर तुम्हाला याचा मेसेज मिळेल. तुम्हाला हप्ता मिळाला आहे हे तुम्हाला या मेसेजद्वारे कळू शकते.
 
* एटीएम द्वारे
जर काही कारणास्तव तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही तुमच्या जवळच्या ATM मध्ये जाऊन 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही हे तपासू शकता.
 
* पासबुकच्या मदतीने
तुम्ही तुमचे एटीएम कार्ड अद्याप बनवले नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन ते तुमच्या पासबुकमध्ये एंट्री करू शकता. यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे देखील कळेल.
 
कोणत्याही कारणामुळे तुमच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करून कारण जाणून घेऊ शकता.
 
 या नंबरवर देखील कॉल करू शकता:-
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
ई-मेल आयडी [email protected]