शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जम्मू चकमकीत तीन जवान शहीद

जम्मू- जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा येथे दशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले असून चार जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत एका दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या या चकमकीत बांदीपुरा येथील काही नागरिकही जखमी झाले आहेत.
 
बांदीपुरा येथे काही दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. ही खबर मिळताच जवानांनी सर्च ऑपरेशनला सुरूवात केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनाही प्रत्युत्तर देत हल्ला च‍ढविला. तीन-चार तासांच्या या धुमचक्रीत तीन जवान शहीद झाले असून चकमक सुरू आहे.