शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (15:57 IST)

झारखंडच्या लातेहारात कर्मामूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या 7 मुलींचा बुडून अंत

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील बालुमाथ पोलीस स्टेशन परिसरात एक वेदनादायक अपघात झाला. मूर्ती विसर्जनादरम्यान बुडून सात मुलींचा मृत्यू झाला. घटना सेरेगाडा पंचायतीच्या मानदिह गावाची आहे. कर्मा विसर्जनासाठी गेलेल्या 7 मुलींचा तलावासारख्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. टोरी शिवपूर रेल्वेमार्गाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी रेल्वे लाईनच्या बाजूला खणलेल्या खड्ड्यात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. 
 
मानदिहमध्ये कर्म पूजा साजरी केली जात होती. शनिवारी कर्मपुजा विसर्जनासाठी गेलेल्या मुली मांडरगडातील तलावात बनवलेल्या खड्ड्यात बुडाल्या. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुलींचा समावेश आहे.रेखा कुमारी,रीना कुमारी,लक्ष्मी कुमारी या तिघी सख्ख्या बहिणी होत्या.त्याचवेळी सुनीता कुमारी,बसंती कुमारी,सुषमा कुमारी आणि पिंकी कुमारी यांचाही मृत्यू झाला. 
 
मूर्ती विसर्जनादरम्यान हा अपघात झाला,
मीडिया रिपोर्टनुसार,डझनभर मुली कर्माच्यामूर्ती विसर्जनासाठी मांडरगडावर गेल्या. त्याचवेळी एका मुलीचा पाय घसरला, मुलींला वाचवण्यासाठी दिलेल्या हाताने एका पाठोपाठ   सात मुली पाण्यातबुडाल्या.ही माहिती मिळताच गावात खळबळ उडाली.आजूबाजूच्या ग्रामस्थांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर सर्व मुलींना बाहेर काढले, जिथे चार मुलींचा जागीच मृत्यू झाला होता, तर उर्वरित तीन मुलींचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकाची अवस्था फारच वाईट आहे.