सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (19:28 IST)

हिमाचलमध्ये पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप दरम्यान अपघात

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात पुन्हा एकदा पॅराग्लायडरच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. 
येथे पोलंडचा एक पॅराग्लायडर मध्य हवेत दुसऱ्या पॅराग्लायडरला आदळल्याने डोंगराळ भागात अडकला. पॅराग्लायडरला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
 
कांगडा जिल्ह्यातील 'बीर बिलिंग' येथे पॅराग्लायडिंग विश्वचषक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका ऑस्ट्रेलियन पॅराग्लायडरला रविवारी टेक ऑफ करण्यापूर्वी त्याच्या पाय मुरगळला.त्यांनतर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांना एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली आहे.
 
आठ दिवसीय पॅराग्लायडिंग विश्वचषक 2024 2 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून या स्पर्धेत 26 देशांतील सात महिलांसह 94 पॅराग्लायडर्स सहभागी होत आहेत.
 
 सुरक्षेचा उपाय म्हणून, दोन हेलिकॉप्टर, रुग्णवाहिकांसह सात आरोग्य पथके आणि मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्सच्या तज्ञांच्या नेतृत्वाखाली सहा बचाव आणि पुनर्प्राप्ती पथके या कार्यक्रमासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
 
गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये दोन परदेशी पॅराग्लायडरचा अपघात झाला. मंगळवारी, एका बेल्जियन पॅराग्लायडरचा बीर बिलिंगमधील दुसऱ्या पॅराग्लायडरशी मध्य-हवेतील टक्कर होऊन दुर्देवी मृत्यू झाला
Edited By - Priya Dixit