बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (09:42 IST)

अमित शाह म्हणाले-मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल

amit shah in jharkhand
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील असलेली झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) युतीवर "नक्षलवादाला प्रोत्साहन" दिल्याचा आरोप केला आणि म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद या संकटातून मुक्त करेल.  
 
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार स्थापन करेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे ही आघाडी विधानसभेच्या 81 पैकी किमान 52 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.
 
तसेच शाह म्हणाले की, "आम्ही गेल्या पाच वर्षांत झारखंडमधून या संकटाचा समूळ उच्चाटन केले आहे आणि आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत भारतातून नक्षलवादाचा नायनाट करेल." सोरेन सरकारने गरीब आणि आदिवासींसाठीचा निधी हडप केल्याचा आरोप करून ते म्हणाले की भाजप सत्तेवर आल्यास झारखंडमधील सर्व भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकेल.
 
Edited By- Dhanashri Naik