जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानाची आत्महत्या
जम्मू : जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्या मधील सैन्यातील एका जवानाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे. आत्महत्या का केली? याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.
शनिवारी रात्री बनिहाल मधील खारी भागातील महाबल येथे आपल्या निवास क्वार्टरमध्ये AK 47या रायफलने त्यांनी स्वत: वर गोळी मारून आत्महत्या केलेली आहे.
यासंबंधीचा पुढील तपास करण्याची कार्यवाही सुरू आहे. नुकताच त्यांची कंपनी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जवानांनी असे पाऊल उचलण्याचे कारण काय हे अद्यापि स्पष्ट झालेले नाहीये. पोलिस याबाबत तपास करत आहेत.