बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (09:09 IST)

गोव्याची आणखी एक ओळख, देशातील पहिले रेबिजमुक्त राज्य

गोवा देशातील पहिलेच रेबिजमुक्त राज्य बनत आहे. मागची पाच वर्षे मिशन रेबिज या मोहिमेखाली एक दशलक्षपेक्षा अधिक श्वानांचे लसीकरण आणि त्याचबरोबर केलेली जागृती त्यामुळेच ही किमया साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा प्रथमच कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिज होऊन मृत्युमुखी पडण्याच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही.   
 
रेबिज रोगासंदर्भात या योजनेखाली शाळांतून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मिशन रेबिजकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2011 साली गोव्यात पाच जणांना रेबिजमुळे मृत्यू आला होता. 2012 साली हा आकडा 13 वर पोहोचला होता. 2013 साली तो खाली उतरून पाचवर आला. मात्र 2014 साली हा आकडा 15 वर पोहोचला होता. 2015 साली पाच, 2016 साली एक, तर 2017 साली दोन मृत्यूंची नोंद झाली.
 
या मोहिमेला मिळत असलेले यश पाहून हाच मॉडेल आता इतर राज्यातही वापरण्यात येणार  आहे. गोव्यात एकूण 1390 शाळांमध्ये रेबिज संदर्भात माहिती देणाऱ्या या मोहिमेखाली कार्यशाळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.