शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (09:47 IST)

बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसदेच्या नवीन इमारतीला देण्याची मागणी असदुद्दीन ओवेसी यांनी केली

Asaduddin Owaisi
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, संसद भवनाच्या नवीन इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे. संसद राज्यघटनेवर चालते, त्यामुळे त्या इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे.अशी मागणी केली आहे. 
केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे  प्रमुख आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम सुरु आहे. 
संसदेची नवीन इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे काम वेगाने सुरु आहे. या साठी अब्जावधी रुपये खर्च केले जात असून या बांधकामात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी येथील अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. 
 
या सगळ्या दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक नवी मागणी केली आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीला राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारला संसद भवनाच्या नवीन इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे आवाहन करतो. संसद राज्यघटनेवर चालते, त्यामुळे त्या इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे.