मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (17:06 IST)

आईच्या हातातून दीड महिन्याचे बाळ पडले, बाळाचा मृत्यू

चेन्नईमध्ये आईच्या हातातून निसटल्याने एका दीड महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या गच्चीवरुन पडून मृत्यू झाला. मृत बाळाचे नाव मुथुराज असून तो अवघ्या दीड महिन्यांचा होता. 

या घटनेची पोलिसांना माहिती देताना माहेश्वरीने सांगितले कि, मुथुराजला अंगावर घेऊन कपडे वाळत घालत असताना त्याने पटकन लाथ मारली. त्यामुळे नियंत्रण सुटले आणि मुथुराज खाली पडला. दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने मुथुराजच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी माहेश्वरीचा नवरा कन्नन घरी नव्हता. तो कामासाठी बाहेर गेला होता. हे दोघे पती-पत्नी भाडयाच्या घरात राहतात. मुथुराज खाली पडल्यानंतर माहेश्वरीने हंबरडा फोडला तो ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. डॉक्टरांच्या पथकाने मुथुराजचा रक्तस्त्राव थांबवून त्याला वाचवण्यासाठी लगेचच शस्त्रक्रिया केली. पण मुलाची प्रकृती अधिक खालवली आणि त्याचा मृत्यू झाला.