बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (10:46 IST)

रक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा कारवाई होणार

हॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा रुग्णांची गैरसोय होते. त्यातच थॅलेसेमिया, किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. सोबतच रुग्णालयातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्त उपलब्ध नाही असं देखील सांगितलं जातं. त्यातून रक्त पिशवी उपलब्ध करुनही दिली जाते, मात्र त्या रक्ताच्या बदल्यात पुन्हा रक्त किंवा रिप्लेसमेंट म्हणून रक्तदाता आणण्यास रुग्णाच्या नातेवाइकांना दबाव आणून सांगण्यात येते. रक्ताच्या बदल्यात रक्तदाता आणण्यास सांगणं गुन्हा असल्याचं एसबीटीसी अर्थात राज्य रक्त संक्रमण परिषदेने आता स्पष्ट केले आहे. आता या परिस्थितीतील रुग्णांनी एसबीटीसीकडे नावानिशी रुग्णालयाची तक्रारी कराव्या असं आवाहन केले आहे. याबाबत तक्रारी आल्यास त्यानुसार संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाणार असल्याचंही एसबीटीसीने स्पष्ट केलं आहे.त्यामुळे होणारा जाच वाचणार आहे.