सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 5 जुलै 2023 (15:22 IST)

तरुणावर लघवी प्रकरणामुळे प्रवेश शुक्ला यांच्या घरावर बुलडोझर जाणार?

Narottam Mishra
Bulldozer will go to the house of Pravesh Shukla मध्य प्रदेशातील सिधी येथे एका आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, काही गोष्टी लक्षात घेऊन बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करताना बुलडोझरची कारवाई केली जाईल, मात्र त्यांनी कुठेतरी अतिक्रमण केले असेल तेव्हाच कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आज तकशी बोलताना सांगितले.
   
 आमदार प्रतिनिधीवर लघवीचा आरोप
आदिवासी तरुणावर लघवी करणारा युवक हा भाजप आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी प्रवेश शुक्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली. त्याचे नाव पाले कोल असून तो सिधी जिल्ह्यातील करोंडी गावचा आहे. मात्र, हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदार शुक्ला यांनी प्रवेश हा आपला प्रतिनिधी नसल्याचे सांगितले.
 
व्हायरल व्हिडिओची दखल घेतली
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) देखील लावला जाईल.