सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (09:17 IST)

छोटा शकीलचा मुलगा अध्यात्माकडे वळला

छोटा शकील याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणच्या पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे मुंबई बॉम्बस्फोटांनंतर परांगदा झाले व पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. यात  छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एकुलता एक असलेला मुलगा मोबाशीर शेख (व18) सध्या शिकत आहे. मात्र मोबाशीरने डॉन म्हणून कुख्यात असलेल्या वडिलांचा रक्तरंजित प्रवास खंडित करीत अध्यात्माची कास धरली असून मौलवी होणं स्वीकारलं आहे. 
 
तर छोटा शकीलचा मुलगा हा कुराण पठणात अव्वल आहे. संपूर्ण कुराण त्याला तोंडपाठ असून गुन्हेगारी विश्वात त्याला रस नाही. छोटा शकीलला दोन मुली आहेत. त्या दोन्ही मुली झोया व अनाम  या विवाहित आहेत. दोघींचेही पती डॉक्टर असून ते कराचीत राहत  आहे.