मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (20:04 IST)

नायक! दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर ८ वर्षांच्या मुलीला, CISF जवानाने धाव घेत मुलीला वाचवले

एका धक्कादायक घटनेत, मेट्रो स्टेशनवर जमिनीपासून 25 फूट उंचीवर ग्रीलमध्ये अडकलेल्या 8 वर्षीय मुलीला केंद्रीय उद्योग सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाने वाचवले. दिल्ली निर्माण विहार मेट्रो स्थानकावर रविवारी शेजारी राहणारी एक मुलगी जाहिरात फलकाशी खेळत कुंपणावर चढली आणि पुढे अडकल्याची घटना घडली. 
 
मुलीचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी सीआयएसएफच्या जवानांना माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी धाव घेत मुलीला वाचवले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची सुटका केल्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर आहे.