रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2017 (17:55 IST)

गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कामत यांच्या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुदास कामत यांच्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरुन हटवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. गुरुदास कामत यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरुन हटवून त्यांच्या जागी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.