भाजप विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट देणार नाही
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होतायत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतल्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व या तीनही महापालिकांवर सध्या भाजपची सत्ता आहे. एकूण 272 नगरसेवकांपैकी 153 नगरसेवक भाजपचे आहेत. या निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेसचंही आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी भाजपनं सगळे नवे चेहरे मैदानात उतरवण्याचं ठरवलंय.