रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2017 (12:17 IST)

विहिपकडून पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोव्यात बीफचा तुटवडा जाणवू देणार नाही असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी केल्यानंतर, विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे.

राज्यात बीफचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागांतून बीफ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. बीफचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत दिलं होतं. पर्रिकर यांच्या या विधानावर वाद सुरु झाला. या वक्तव्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे.