शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (09:32 IST)

Road Accident :12 भाविकांना कारने चिरडलं

accident
गुजरातमधील अंबाजी येथे शुक्रवारी पहाटे एक मोठा अपघात झाला. येथे एका भरधाव कारने पायी जाणाऱ्या यात्रेकरूंना धडक दिली. भाविकांना पायदळी तुडवताना बेकाबू कार निघून गेल्याचे बोलले जात आहे. येथे कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पंचमहालचे रहिवासी आहेत. हे सर्व लोक प्रसिद्ध शक्तीपीठ अंबाजी माता मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. यादरम्यान एका कारने भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश प्रवासी अंबाजी मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. अपघातात कारचे पूर्ण नुकसान झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
5 सप्टेंबरपासून जगप्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या अंबाजी येथे सहा दिवसीय भादरवी पूनम जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळा 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने अंबाजीत पोहोचत आहेत. बनासकांठा जिल्हा प्रशासन आणि आरासुरी अंबाजी माता देवस्थान ट्रस्ट गेल्या अनेक दिवसांपासून जत्रेची तयारी करत आहेत.