गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (11:56 IST)

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
 
१२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यांसह त्यांच्या दोन साथीदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता.
 
पाठीमागच्या 11 दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात योग्य उपचार घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे  महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.