सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (08:03 IST)

धीरेंद्र शास्त्रींनी केले साईबाबाविषय़ी धक्कादायक विधान; भाजपच्या मंत्र्याकडूनही कारवाई करण्याची मागणी

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी आज पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यापुर्वीही त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान करून अनेक लोकांच्या भवना दुखावल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. धिरेंद्र शांस्त्रींनी आता साईंबाबाविषयी वादग्रस्त विधान केले असून त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे.
 
आपल्या दरबारात धिरंद्र शास्त्राी यांनी आपल्या भाविकांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. भक्तांपैकी एकाने सनातन धर्मात साईबाबांची पूजा करावी की नाही? असा प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारल्यानंतर “साईबाबा हे संत असतील पण भगवान असू शकत नाहीत. गिधाडाचे चामडे पांघरल्याने कोणी सिंह होत नाही.” असे विधान करत त्यांनी आपल्या भक्ताला उत्तर दिले.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, “शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिले नसून शंकराचार्यांचे विचार हे प्रत्येकाला बंधनकारक आहेत. शंकराचार्य हे सनातनी धर्माचे पंतप्रधान असल्यामुळे प्रत्येक हिंदूने ते ऐकलं पाहिजे. कोणताही संत असूदे मग तो आपल्या धर्माचा जरी असला तरी तो देव होऊ शकत नाही.” असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही कोणाच्याही भावनांचा अपमान करत नसून साईबाबा संत असू शकतात…फकीर असू शकतात…मात्र, देव होऊ शकत नाही.” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
 
धिरेंद्र शास्त्रींच्या या विधानानंतर राजकिय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिय़ा आल्या असून भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “हे बाबालोक स्वत: देवाचं रूप घेऊन लोकांची बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला पाहीजे. धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता पसरवण्याचं काम करतात. कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे. लोकांच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार यांना नाही,” असे राज्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हटलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor