1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:30 IST)

गोमांस खाऊ नका : जागतिक आर्थिक परिषद

जागतिक आर्थिक परिषदेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ने गोमांस न खाल्ल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील. त्याचबरोबर ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जनही कमी होईल. त्यामुळे शक्यतो लोकांनी गोमांस खाणे टाळावे, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे. एका अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारावर परिषदेने हा दावा केला असल्याचे म्हटले आहे. जागतिक आर्थिक परिषदेसाठी ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलने हा अभ्यास केला होता.
 
गोमांस खाणे सोडल्याने लोकांचे आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणही शक्य होईल. सध्या जगात जेवढे मृत्यू होताहेत. त्याला गोमांस सेवन हे सुद्धा एक कारण आहे. जर गोमांस खाणे बंद केले गेले. तर जागतिक स्तरावर २.४ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण कमी होईल. श्रीमंत देशांमध्ये गोमांस खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तिथे जर का याचे सेवन कमी केले गेले, तर त्या देशांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत मृत्यूचे प्रमाण कमी होईल. गोमांस खाण्यापेक्षा इतर ज्या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे, त्यांचे सेवन करणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे.