रविवार, 6 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (14:49 IST)

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भाजपचा जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला

भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी स्वर कोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे रविवारी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा 'लोक कल्याण संकल्प पत्र' प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला . भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी येथील पक्ष कार्यालयात ही माहिती दिली. गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज संकल्प पत्र जारी करणार होते. 
 
स्वतंत्रदेव सिंह म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी पुन्हा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे इतर राजकीय कार्यक्रम जसेच्या तसे सुरू राहणार असल्याचे स्वतंत्रदेव सिंह यांना स्पष्ट केले. शाह, योगी आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यावेळी उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.