रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 24 जुलै 2024 (12:40 IST)

इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी मित्राला एअर गन मागितली चुलत भावाने गोळी झाडली, तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीमध्ये माहित झाले की, एक तरुण इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी आपल्या मित्राकडून एयर गन मागितली त्यानंतर हा तरुण अंघोळ करीत असतांना त्याच्या चुलत भावाने एयर गनने फायर केले या गन मधून छर्रा निघाला व तरुणाच्या मानेवर मागील भागाला लागला ज्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. 
 
सध्या रील बनवण्याची स्पर्धा वाढली आहे. लाखोंनी लाईक मिळावे म्हणून जीवाशी खेळताना दिसतात. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. एयर गन मुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बिधुना नगरच्या आदर्श नगरमध्ये राहणारा मृतक गजेंद्र याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. व सांगितले की त्यांचा मुलगा घरामध्ये अंघोळ करीत होता. व त्याच्या चुलत भावाने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यामुळे तो जमिनीवर कोसळला. व त्याला लागलीच रुग्णालयात नेले पण वाटेतच त्याच्या मृत्यू झाला. पोलिसांनी मृतकाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून तीन जणांना अटक केली आहे व पुढील चौकशी पोलीस करीत आहे.