गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (20:17 IST)

Gautam Adani Wealth: गौतम अदानीने संपत्तीच्या बाबतीत जेफ बेझोसला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला

gautam adani
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. यापूर्वी या यादीत एक पायरी खाली घसरलेल्या अदानीने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. यावेळी ते पुन्हा एकदा जेफ बेझोसला मागे टाकत जगातील तिसरे  श्रीमंत व्यक्ती बनले  आहे. 
 
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत त्यांची एकूण संपत्ती 148.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या आकड्यासह ते  पुन्हा एकदा जगातील तिसरे  श्रीमंत व्यक्ती बनलेआहे.
 
गौतम अदानी यांच्या संपत्तीच्या वाढीमुळे त्यांना अॅमेझॉनचे संस्थापक आणि प्रमुख, एकेकाळचे जगातील नंबर वन अब्जाधीश जेफ बेझोस देखील सोडले आहेत. फोर्ब्स इंडेक्सनुसार जेफ बेझोस यांची संपत्ती 136.7 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीत घट झाल्यामुळे ते आता जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
 
काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की गौतम अदानी लवकरच जेफ बेझोसला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकू शकतात. गौतम अदानी यांनी आता जेफ बेझोस यांना 12.1 अब्ज डॉलरने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. आता जगात फक्त इलॉन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सीईओ आणि फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट हे गौतम अदानी यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.