गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (10:48 IST)

नवरदेवाचा स्टेजवरच मृत्यू

marriage
बिहारच्या सितमारगीच्या एका गावात बुधवारी रात्री लग्नाच्या समारंभात जयमालाच्या विधीनंतरच वराचा मंचावरच मृत्यू झाला. डीजे हे मृत्यूचे कारण असल्याचे मानले जाते. डीजेच्या आवाजामुळे हृदयाच्या झटक्याने वराचा मृत्यू झाले असे सांगितले जात आहे. या वेदनादायक घटनेमुळे तेथे केवळ दोन कुटुंबच नाहीतर अख्ख गावात शोक पसरला आहे. 
 
सोनबार्सा पोलिस स्टेशन परिसरातील ऐका गावात विवाह सोहळा चालू असताना स्त्रिया आनंदाची गाणी गात होती. तसेच जयमालाचा कार्यक्रम स्टेजवर चालू होता. जयमाला नंतर अचानक वर स्टेजवर पडला आणि त्या जागीच मरण पावला. तथापि त्याला ताबडतोब स्थानिक खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले, जिथे त्याला तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले. अशा प्रकारे आनंद शोकात बदलला.