शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 मे 2023 (19:52 IST)

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या वतीने प्रथमच आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल "द साउंड ऑफ म्युझिक" भारतात दाखल

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या वतीने 'द साउंड ऑफ म्युझिक' सादर करता येणारअसून हे आता पर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि पसंतीस उतरलेल्या ब्रॉडवे म्युझिकल्स पैकी एक आहे. 
 
7 वेळा  टोनी पुरस्काराचा मानकरी ठरलेला  या कार्यक्रमाचा प्रवेश केवळ संगीतमय नसून आंतरराष्ट्रीय ब्रॉडवेचे भारतात पदार्पण आहे. 1930 दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संगीत, प्रणय आणि सांघर्षावरील आनंद  या द्वारे मानवी  वृत्तीच्या विजयाचे चित्रण हा कार्यक्रम करतो. यादर्जेदार निर्मितीत माय फेव्हरेट थिंग्ज', 'डू रे मी ', '‘द हिल्स आर अलाइव्ह आणि 'सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हेंटीन’ यांसारख्या 26 गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे.
 
या प्रसंगी बोलताना संस्थापिका आणि अध्यक्षा श्रीमती नीता मुकेश अंबानी म्हणाल्या, "नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे  म्यूजिकल म्हणून द साऊंड ऑफ  म्युजिक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही द ग्रेट इंडियन म्यूजिकल मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट संगीताचे प्रदर्शन केले आणि आता आत्तापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संगीत भारतात आणताना आम्हाला आनंद होत आहे. 
 
''कला ही अशा आणि आनंद पसरवते, असे मी मानते. 'द साउंड ऑफ म्युझिक' आनंददायक आणि कालातीत आहे. मला आशा आहे की मुंबई आणि भारतातील लोक त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मुलांसह याचा आनंद घेतील, असे त्या पुढे म्हणाल्या. 
 
ग्रँड थिएटर 2000 आसंन क्षमता असलेले संगीतासाठी योग्य ठिकाण प्रदान करते. ऑस्ट्रियातील 1930 च्या दशकातील निसर्गरम्य पार्श्वभूमी, लाइव्ह ऑर्केस्ट्रा, आणि रंगमंचावर लाइव्ह गायनाचा अनुभव इथे उपलब्ध होत आहे. 'द साउंड ऑफ म्युझिक'  हे प्रेम, हास्य, आणि संगीताचा एक अविस्मरणीय विलक्षण कार्यक्रम असल्याचे वचन देते. यंदा उन्हाळ्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी भारताबाहेर प्रवास करण्याची गरज नाही. नीता मुकेश अंबानी कल्चरल  सेंटर मध्ये 'द साउंड ऑफ म्युझिक'  अनुभवण्यासाठी तुमची तिकिटे आत्ताच  www.nmacc.com किंवा www.bookmyshow.com वर बुक करा.