शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:38 IST)

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांना विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रण

विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे निमंत्रण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आलं आहे. 
 
कृषी कायद्यांना मागे घेण्याच्या मागणीवरुन देशात दिल्लीच्या वेशीवर मोठे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल विदेशातही घेतली जातेय. ग्रेटा थनबर्ग यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनतर आता ग्रेटा यांना नाशिक येथे आोयोजित केले जाणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. याविषयी सांगताना, “या विद्रोही साहित्य संमेलनात संविधानाच्या सन्मानार्थ विचारविनियम होणार आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला तसेच शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या विचारवंतांना या संमेलनाचे आमंत्रण दिले जाणार आहे. ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांनाही या संमेलनाचे निमंत्रण दिले आहे,” असे विद्रोही साहित्य संमेलनाचे सदस्य राजू देसले यांनी सांगितले.
 
यावेळी बोलताना राजू देसले यांनी सांगितले की, “आम्ही संविधानाची मूल्ये माणणारे आहोत. मराठी साहित्य संमेलनाला सरकारने 50 लाख रुपये दिले आहेत. आमच्यामुळे त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. एक मूठ धान्य आणि 1 रुपया जमा करुन आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतोय. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनास अडचण निर्माण नाही.