एका चहावाल्याच्या अकाउंटमध्ये 4.8 कोटी रुपये!
आपल्याला पंजाबच्या त्या टॅक्सी ड्राइवरची गोष्ट तर लक्षातच असेल ज्याच्या अकाउंटमध्ये 9,806 कोटी रुपये आले होते. हे बँकेच्या चुकीमुळे झाले होते. अशीच एक घटना जयपुरच्या चहावाल्यासोबत घडली. तो तेव्हा आश्चर्यात पडला जेव्हा इन्कमटॅक्स ऑफिसर त्याच्या घरी आले. आणि त्यावर आरोप लावला की त्याने ब्लॅकमनी व्हाईट केली आहे.
राजकुमार एक चहावाला आहे. त्याची आयकर विभागाच्या ऑफिसर्सने पर्ण पाच तास चौकशी केली. त्याचे आयचे स्रोत विचारले गेले परंतू तो उत्तर देऊ शकला नाही. तेला बँकेत नेल्यावर बँक ऑफिसर्सने स्वीकार केले की चुकीने त्याच्या अकाउंटमध्ये हा पैसे ट्रांसफर झाले आहे.