बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (12:37 IST)

जेईई, नीटचा मार्ग यंदा सुकर

बारावीची परीक्षा दिलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा जेईई, नीट या देशपातळीवर होणाऱया मेडिकल आणि इंजिनीयरिंगच्या स्पर्धा परीक्षांचा मार्ग यंदा (JEE, NEET Competitive Easer) सुकर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा निकाल यंदा 4.33 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी अंतर्गत मूल्यमापन नव्हते. तसेच प्रश्नपत्रिकेतही पर्यायी प्रश्न कमी असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना बारावीत 50 टक्के गुणही मिळविता आले नाहीत. त्यामुळे जेईई आणि नीटमध्ये चांगली कामगिरी करूनही हे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी अपात्र ठरले होते. यंदा मात्र अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण व प्रश्नपत्रिकेतील पर्यायी प्रश्नांमुळे विज्ञान शाखेतील गुणवंतांची संख्या वाढली आहे.
 
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विज्ञान शाखेच्या विषयांत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यंदा बदलले होते. प्रश्नपत्रिकेतील (escedtion A les escedtion D) मध्ये पर्यायी प्रश्नांची संख्या शिक्षण मंडळाने वाढविल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविणे सोपे झाले.
असे होते यंदाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सेक्शन ए – मल्टीपल चॉईज प्रश्न, प्रत्येकी 1 गुण
(दहा पैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा.)
सेक्शन बी – बारापैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा,
प्रत्येकी 2 गुण
सेक्शन सी – बारा पैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा,
प्रत्येकी 3 गुण
सेक्शन डी – पाच पैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा, प्रत्येकी 4 गुण