शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (10:52 IST)

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

Death
ऊत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एकदा परत इयरफोन काळ बनले आहे. इथे बरहन क्षेत्रात कानात इयरफोन असल्यामुळे रेल्वेच्या धडकेने दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या सोबत असलेली तिसरी बहीण बेपत्ता आहे. 
 
पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली. सांगितले जात आहे की, तिघी बहिणी भागवत कथा ऐकून घरी जात होत्या. या दरम्यान हा अपघात घडला. घटनास्थळावून पोलिसांनी मोबाईल फोन ताब्यात घेतले आहे. तर मृतकांच्या कानात इयरफोन लावलेले होते. 
 
बरहन पोलीस स्टेशन निरीक्षक राजीव राघव म्हणाले की, या तिघी बहिणी रात्री उशिरापर्यंत भागवत कथा ऐकून घरी जात होत्या. तसेच नगाला छबीला गावाजवळ गुरुवारी रात्री दिल्ली हावडा रेल्वे ट्रॅकवर या दोघी बहिणींचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की दोघींच्या कानामध्ये इयरफोन लावलेले होते. पोलिसांना संशय आहे की, इयरफोन लावल्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे त्यांचा अपघात झाला. तसेच पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर मोबाईल फोने देखील मिळाले. याशिवाय पोलीस तिसऱ्या मुलीबद्दल माहिती गोळा करीत आहेत.