सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इंदूरमध्ये किर्तन परिचय शिबिर, मुलांनी दिली किर्तनाची प्रस्तुती

समर्थ मठ संस्थान इंदूर तर्फे आठ दिवसाचे किर्तन परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 6 ते 63 वर्षापर्यंतचे 16 जणांनी उत्साहाने भाग घेतला. प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. ऐवज भांडारे यांनी प्रशिक्षण दिले. 
 
4 जून 2023 रविवार रोजी शिबिराची सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यात श्री कानडकर बुवा पुराणिक बुवा आणि सौ उत्तमा भट हजर होते त्यांनी आपले शुभाशीर्वाद दिले आणि या सोहळ्याचा प्रारंभ झाला. आठ दिवसीय या शिबिरात दररोज सायंकाळी तीन तास प्रशिक्षण देण्यात आले. अक्षदा दातोंडे, धनिष्ठा देशपांडे, धन्वी देशपांडे, सिद्धेश फडके, प्रज्ञेश फडके, अवधूत इनामदार, श्रावणी दातोंडे, साक्षी बापट, उन्नती चोरघडे, उषा चोरघडे, यशस्वी जोशी, विद्या जोशी, वैशाली फडके, मंगेश भालेराव, चैतन्या कापसे, अन्विता सपकाळ यांनी प्रशिक्षण घेतले. दरम्यान मुलांना कीर्तनाच्या प्रस्तुतीची तयारी करवून रविवारी संध्याकाळी मुलांनी शिकलेले किर्तन प्रस्तुत केले. 
 
एक पूर्व रंग व आख्यानाचे थोडे थोडे टप्प्याने भाग प्रस्तुत केले गेले. कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला ज्यात मुलांमध्ये वेगळाच उत्साह बघायला मिळाला. किर्तनाप्रती मुलांची गोडी यावरुन कळून आली जेव्हा त्यांनी पुढच्या वर्षी निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची मागणी केली. या मोठ्या संख्येने भाग घेणारा बहुधा हा इंदूरचा  प्रथमच उपक्रम होता. 
उद्घाटन सोहळ्याचे संचालन श्री अशोक पाटणकर यांनी केले. समापन सोहळ्यासाठी आचार्य श्री प्रवीण नाथ महाराज हजर होते त्यांच्या शुभाशीर्वादाने या सोहळ्याची सांगता झाली. समापन सोहळ्यात प्रशिक्षु जणांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अतिथींचे स्वागत समर्थ मठ संस्थांच्या विश्वस्तांनी केला.