रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिल नाही तरी रुग्णाला डिस्चार्ज दिलाच पाहिजे - कोर्ट

बिल नाही भरल्यास रुग्णालय प्रशासन एखाद्या रुग्णाला डांबून ठेवू शकत नाही असे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले. रुग्णालयाने त्याला डिस्चार्ज दिलाच पाहिजे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
मध्यप्रदेशमधील माजी पोलीस अधिकार्‍यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचारांचे आत्तापर्यंत सुमारे 13.50 लाख रुपयांचे बिल झाले आहे. हे बिल न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने वडीलांना डिस्चार्ज न देता रुग्णालयात डांबून ठेवल्याचे आरोप रुग्णाच्या मुलाने केला होता. रुग्णालयात वडीलांवर योग्य उपचार होत नसल्याने त्यांना परत न्यायचे असल्याचे त्याचे म्हणणे होते. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती.