रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2017 (16:29 IST)

पंतप्रधानांचा 'मन की बात' कार्यक्रम आता पुस्तक स्वरूपात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकाशवाणीवरील लोकप्रिय 'मन की बात' हा कार्यक्रम आता पुस्तक स्वरूपातही उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमावरील दोन पुस्तकांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभादरम्यान प्रकाशन होणार आहे. या दोन्ही पुस्तकांच्या प्रती राष्ट्रपतींना दिल्या जातील. 'मन की बात : अ सोशल रिव्होल्यूशन ऑन रेडिओ' आणि 'मार्चिंक विथ अ बिलियन - अँनालायझिंग नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट अँट मिडटर्म' अशी या दोन्ही पुस्तकांची नावे आहेत. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन राष्ट्रपतींकडे या दोन्ही पुस्तकांच्या प्रती सुपूर्द करतील. त्यानंतर राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभादरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते या पुस्तकांचे औपचारिक प्रकाशन केले जाईल. 'मन की बात : अ सोशल रिव्होल्यूशन ऑन रेडिओ' हे पुस्तक राजेश जैन यांनी लिहिले आहे. यात मोदींच्या 'मन कि बात'मधील आतापर्यंतच्या संबोधनांचा समावेश आहे. 'मन की बात' कार्यक्रम न्यू इंडियासोबत विशेषत: युवकांसोबत कसा जोडला आहे याचे वर्णन यात करण्यात आले आहे.