रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (14:59 IST)

मुकेश अंबानींनी आपल्या कर्मचाऱ्याला 1500 कोटींचे 22 मजली घर भेट दिले

मुंबई : मुंबई रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमीच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी उभे असतात.उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठे मन दाखवले आहे. खरं तर, अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दीर्घकाळ कर्मचारी असलेल्या मनोज मोदी यांना आणि त्यांच्या खास व्यक्तींपैकी एक आलिशान घर भेट दिले आहे. हे घर किती भव्य असेल, याचा अंदाज यावरून बांधता येतो की त्याची किंमत 1500 कोटी रुपये आहे. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्वात विश्वासू कर्मचाऱ्यांमध्ये गणले जातात आणि ते मुकेश अंबानींचे उजवे हात म्हणूनही ओळखले जातात.
 
रिपोर्ट्सनुसार, अंबानींनी मनोज मोदींना भेट दिलेलं घर 22 मजली आहे. एवढेच नाही तर ते मुंबईच्या प्राइम लोकेशन, नेपियन सी रोडवर वसलेले आहे. वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वी मनोज मोदींना हे घर भेट दिले होते. गेल्या अनेक दशकांपासून रिलायन्सचे विश्वासू कर्मचारी असलेले मनोज मोदी सध्या रिलायन्स जिओ आणि रिटेलचे संचालक आहेत.
 
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला भेट दिलेल्या भव्य इमारतीचे नाव वृंदावन ठेवण्यात आले आहे. ज्या रस्त्यावर ही इमारत आहे त्याच रस्त्यावर जिंदाल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांचेही निवासस्थान आहे. त्यांच्या घराचे नाव माहेश्वरी हाऊस आहे. नेपियन सी रोड जेथे ही इमारत आहे तेथे जमिनीचे दर 70,600 रुपये प्रति चौरस फूट आहेत. अशाप्रकारे मनोज मोदींच्या इमारतीची किंमत 1500 कोटी रुपये एवढी आहे.
 
रिलायन्ससाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या मनोज मोदी यांना मुकेश अंबानी यांनी 22 मजली इमारत भेट दिली आहे. अंबानींचा 'उजवा हात' म्हणवले जाणारे मनोज मोदी हे कंपनीच्या स्थापनेपासूनच सोबत आहेत. ते रिलायन्सचा कर्मचारीच नाही तर मुकेश अंबानींचे मित्रही आहे.
 
रिलायन्सच्या सर्व डीलच्या यशामागे मनोज मोदींचा हात आहे. वर्षानुवर्षे ते कंपनीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने अथकपणे काम करत आहेत. केवळ मुकेश अंबानीच नाही तर आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी देखील मनोज मोदींच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात.

Edited By- Priya Dixit